सुखं आणि दु:ख ! माणसाच्या मनात उठलेला प्रचंड कल्होळ, उभ्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्यासाठी चाललेली ही वेडी धडपड.
पण हे सर्व कशामुळे?.....
तर अपेक्षा - निव्वळ अपेक्षा.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असणाऱ्या माणसाच्या अपेक्षा, इच्छा-आकांक्षा आणि स्वप्न !
अपेक्षांची पूर्ती म्हणजेच सुखं आणि अपेक्षाभंग म्हणजे दु:ख ! पण जेथे इच्छा- आकांक्षाच नाहीत, स्वप्नही नाहीत, तिथं कसलं सुखं आणि कसलं दु:ख !
पण ते जगण तरी काय जिथं स्वप्न फुलविण नाही आणि कसली आकांक्षाच नाही.
सुखं आणि दु:ख यांचा आयुष्यातला खेळ म्हणजेच जीवन. दु:ख आहे म्हणून सुखाची जाणीव होते आणि सुख आहे म्हणूनच दु:खही आहे.
मानवी मनाला सुखं आणि दु:ख या दोघांची गरज आहे. माणूस जगतो तो यामुळेच !
No comments:
Post a Comment