Monday, October 25, 2010

बायको 


बायको कशी असावी? एक सामान्य प्रश्न ... परंतु उत्तर कठीण आहे, कारण जितका प्रश्न सोपा तितकं उत्तर कठीण. हजारो-लाखो उत्तरे या प्रश्नासाठी मिळतील. यातील साठ टक्के उत्तरे नक्कीच तिच्या सौंदर्यासाठी असतील. सुंदर पत्नी असावी असे प्रत्येकालाच वाटत असतं अर्थात यामध्ये चूक असे काहीच नाही. कुणाला नकोय सुंदर पत्नी? स्रीच्या सौंदर्यासाठी वेडे झालेल्या पुरषांची संख्या काही कमी आहे? आपला इतिहासच याला साक्षी आहे. निसर्गानं स्त्रीचं सौंदर्य हे पुरुषासाठीच निर्माण केलंय असाही समज पुरुषवर्गाचा झाल्यास काही नवल नाहीय! 

सौंदर्याची व्याख्या काय? सौंदर्य म्हणजे नक्की काय? ....कुणी म्हणेल तिचा चेहरा चंद्रासारखा असावा, डोळे हे हरिणीसारखे असावेत, नाक चाफेकळीसारखे असावे, तर उमलणाऱ्या कळीसारखे नाजूक ओठ अन खळखळणाऱ्या सागरासारख यौवन! ...बस्स. झालं हे सौन्दर्याच गुणगाण, झाली ही सौंदर्याची व्याख्या! एवढे सौंदर्याचे गुण जर त्या स्त्रीत असतील, तर ती स्त्री सुंदर पत्नी होऊ शकते? तुला माहित आहे, माणसाला दोन चेहरे असतात. एक दिसणारा अन दुसरा न दिसणारा. दिसणारा म्हणजे तुझं बाह्यरूप आणि न दिसणारा म्हणजे तुझे अंतरंग. तू कुठला निवडशील? तू म्हणशील दोन्ही! पण ते शक्य नाही. शक्य नाही म्हणजे अशक्य नाही अशातला भाग नाही. परंतु तुझ्यामाझ्यासारख्या माणसाला सहजासहजी मिळणारी ती गोष्ट नाहीय.  मिळाली तर तुझ्यासारखा भाग्यवान तूच. माग पुढे लिहावयास मला लागणारच नाही.

पण...पण...मला पुढे लिहावयास लागणार आहे कारण प्रत्येकाच्या बाबतीत ते शक्य नाहीय. प्रत्येक माणसाला पूर्णपणे तृप्त करणं हे नियतीच्या मनांत नसते. म्हणूनच आपल्याला दोन्ही पैकी एकाची नक्कीच निवड करावी लागणार आहे. अर्थात कुणी कशाची निवड करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या व्ययक्तिक प्रश्नांमध्ये मला दाखल घेण्याचा काहीही अधिकार नाहीय. 

सौंदर्य आणि स्वभाव ह्या दोन अवस्था जवळजवळ वेगळ्याच. कोणतीही देखणी वस्तू आपल्याला तत्क्षणी आवडते करणं ती केंव्हातरी दिसते म्हणूनच जास्त आवडते, सातत्य टिकत, करणं तिचा सहवासही काही क्षणाचाच असतो. दीर्घ परिचयानंतरही जर ती व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर माणसा सगुण-साकारा पलीकडच सौंदर्य दिसू लागतं, अनुभवायला मिळतंय असं समजावं...पण ते शक्य आहे? सुंदर रुपी स्त्रीचे विचारही तेवढेच सुंदरही असू शकतील? माणसा, ते एक आकर्षण आहे म्हण किंवा नाविन्याची ओढ पण ते एक नक्कीच मृगजळ आहे आणि त्या मृगजळामाग धावायचा नाद सोड कारण आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो म्हणून आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतंच असतं.   

स्त्रीचं अंतरंग हे एक तिचे न दिसणारे अद्वितीय सौंदर्य आहे. जे डोळ्याला दिसतं ते या कालचक्रातील काळाचा महिमा आहे आणि जे अंतरंग आहे ते परमेश्वरान दिलेलं अमृत आहे. तेंव्हा अंतरंगातील सौंदर्य जाणून घ्यायचा प्रयत्न कर! म्हणजे तुला कळेल खरे सौंदर्य काय असते ते! अंतरंगातील सौंदर्य जाणून घ्यायला सहवासाची जरुरी लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. माणसा, सौंदर्याच्या माग आपण धावायचं नसतं तर सौंदर्यान आपल्यामाग यावयाच असतं.  

...जाता जाता तुला एवढेच सांगतो, सौंदर्यान बुद्धी विकत घेता येत नाही पण बुद्धीन सौंदर्य नक्कीच घेता येत!               
         

No comments:

Post a Comment