Sunday, October 31, 2010

स्वप्न ! 


ती एक अपूर्व संध्याकाळ होती. खरंच अपूर्व एवढ्यासाठीच म्हणावयास हवे की त्या संध्याकाळणे मला जगण्यासाठी एक नवीन दिशा दाखविली. संध्याकाळच्या त्या निसर्गरम्य वातावरणात एकीकडे तो तांबूस रंगाचा सूर्य अस्ताला जात असतानाच दुसरीकडून ती आपल्या नाजूक पावलांनी जमिनीवरील धूळ उधळीत, शरीराला लचके देत येत होती. जलतरंगवरील जसे निरनिराळे स्वर यावेत तसे तीच्या पायातील पैंजणाचे मंजूळ स्वर हवेमध्ये एक वेगळाच आभास निर्माण करीन होते. वसंत ऋतूत ज्याप्रमाणे झाडांना पालवी फुटू लागते तद्वतच तीला पाहताच मनामध्ये एक प्रकारची नवीन जागृती निर्माण होत होती. जणूकाही परमेश्वराने नयन हे फक्त तिचे सौंदर्य टिपून घेण्यासाठीच दिलेले आहे असे वाटत होते अन तिला स्वर्गातून या पृथ्वीतलावर फक्त ...फक्त माझ्यासाठीच पाठविली आहे.

ती आली, तिला पहिले आणि त्याचवेळी कळाले कि आयुष्य हे जगण्यासाठीच आहे. सभोवतालचा बहरलेला परिसर तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. वृक्षांवरील नाजूक कळ्या उमलण्यासाठी धडपडत होत्या, कोकिळेची गोड शिळ मनाला उत्तेजित करीत होती. मोर आपला पिसारा फुलवून आनंद आणखीनच वाढवित होता. समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा जीवनाचे ध्येय समजावत होत्या. मी हलकेच हात पुढे करून तिचा चेहरा माझ्या हातामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तिला पुसटसा स्पर्श झाला अन ... अन शरीरातून एक हलकीच लकीर निघून गेली. तीने आपला चेहरा हळूच माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्याक्षणी मला माझ्या कर्तव्याची पूर्ण जाणीव झाली. जोडीदाराच्या सहकार्याची कल्पना येत होती. 'जीवन हे गाणे गातच रहावे'  असे गाणा-याची सारखी आठवण येत होती. माझ्या बाहूपाशात सामावलेली ती मला आपल्या जीवनाचं मर्म सांगत होती. निश्चयी चेहरा, नजरेतील प्रेमाची ओढ, सातजन्माचा ऋणानुबंध सांगण्यासाठी मला हलकेच बांधून ठेवणारा तीचा रेशमी केशभंगार  मला अधिकच सुखावत होता. तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज सप्तसुरांची आठवण करून देत होता.  

...पारिजातकाच्या वृक्षाखालील ते दृश्य मनमोहक असंच होत. पारिजातकाला  ती रेलून बसली होती अन तीच्या मांडीवर मी हलकेच विसावलेलो होतो. तीचा हात माझा चेहरा गोंजारीत होता. शुभ्र पारिजातकाची फुले हळूवारपणे आमच्या शरीरावर आपले आवरण चढवित होती. आज खरंच तीचा चेहरा खूप फुलाला होता. कशाचीही चिंता, काळजी तीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तू आणि मी हीच भावना तिच्यामध्ये आज दिसत होती. मुक्यानेच सर्व काही गोष्टींची किलबिल चालू होती. शब्दांच अस्तित्व आता राहिलंच नव्हत. शब्दांची जागा आता नजरेन आणि स्पर्शान घेतली होती. ही दुनिया आता चार लोचनांच्या दोन पाखरांसाठीच होती. समुद्राच्या माग सूर्य ढगाआड होत होता अन मी हलकेच माझे ओठ तीच्या कपाळावर टेकविले आणि ....आणि एवढ्यात 

......एवढ्यात घंटेचा आवाज ऐकू आला, मी दार उघडले अन दारात दूधवाला उभा होता आणि...आणि...
                                                                                                                                                               ....... समोर सूर्याची किरणे डोकावित होती!              

Monday, October 25, 2010

बायको 


बायको कशी असावी? एक सामान्य प्रश्न ... परंतु उत्तर कठीण आहे, कारण जितका प्रश्न सोपा तितकं उत्तर कठीण. हजारो-लाखो उत्तरे या प्रश्नासाठी मिळतील. यातील साठ टक्के उत्तरे नक्कीच तिच्या सौंदर्यासाठी असतील. सुंदर पत्नी असावी असे प्रत्येकालाच वाटत असतं अर्थात यामध्ये चूक असे काहीच नाही. कुणाला नकोय सुंदर पत्नी? स्रीच्या सौंदर्यासाठी वेडे झालेल्या पुरषांची संख्या काही कमी आहे? आपला इतिहासच याला साक्षी आहे. निसर्गानं स्त्रीचं सौंदर्य हे पुरुषासाठीच निर्माण केलंय असाही समज पुरुषवर्गाचा झाल्यास काही नवल नाहीय! 

सौंदर्याची व्याख्या काय? सौंदर्य म्हणजे नक्की काय? ....कुणी म्हणेल तिचा चेहरा चंद्रासारखा असावा, डोळे हे हरिणीसारखे असावेत, नाक चाफेकळीसारखे असावे, तर उमलणाऱ्या कळीसारखे नाजूक ओठ अन खळखळणाऱ्या सागरासारख यौवन! ...बस्स. झालं हे सौन्दर्याच गुणगाण, झाली ही सौंदर्याची व्याख्या! एवढे सौंदर्याचे गुण जर त्या स्त्रीत असतील, तर ती स्त्री सुंदर पत्नी होऊ शकते? तुला माहित आहे, माणसाला दोन चेहरे असतात. एक दिसणारा अन दुसरा न दिसणारा. दिसणारा म्हणजे तुझं बाह्यरूप आणि न दिसणारा म्हणजे तुझे अंतरंग. तू कुठला निवडशील? तू म्हणशील दोन्ही! पण ते शक्य नाही. शक्य नाही म्हणजे अशक्य नाही अशातला भाग नाही. परंतु तुझ्यामाझ्यासारख्या माणसाला सहजासहजी मिळणारी ती गोष्ट नाहीय.  मिळाली तर तुझ्यासारखा भाग्यवान तूच. माग पुढे लिहावयास मला लागणारच नाही.

पण...पण...मला पुढे लिहावयास लागणार आहे कारण प्रत्येकाच्या बाबतीत ते शक्य नाहीय. प्रत्येक माणसाला पूर्णपणे तृप्त करणं हे नियतीच्या मनांत नसते. म्हणूनच आपल्याला दोन्ही पैकी एकाची नक्कीच निवड करावी लागणार आहे. अर्थात कुणी कशाची निवड करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या व्ययक्तिक प्रश्नांमध्ये मला दाखल घेण्याचा काहीही अधिकार नाहीय. 

सौंदर्य आणि स्वभाव ह्या दोन अवस्था जवळजवळ वेगळ्याच. कोणतीही देखणी वस्तू आपल्याला तत्क्षणी आवडते करणं ती केंव्हातरी दिसते म्हणूनच जास्त आवडते, सातत्य टिकत, करणं तिचा सहवासही काही क्षणाचाच असतो. दीर्घ परिचयानंतरही जर ती व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर माणसा सगुण-साकारा पलीकडच सौंदर्य दिसू लागतं, अनुभवायला मिळतंय असं समजावं...पण ते शक्य आहे? सुंदर रुपी स्त्रीचे विचारही तेवढेच सुंदरही असू शकतील? माणसा, ते एक आकर्षण आहे म्हण किंवा नाविन्याची ओढ पण ते एक नक्कीच मृगजळ आहे आणि त्या मृगजळामाग धावायचा नाद सोड कारण आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो म्हणून आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतंच असतं.   

स्त्रीचं अंतरंग हे एक तिचे न दिसणारे अद्वितीय सौंदर्य आहे. जे डोळ्याला दिसतं ते या कालचक्रातील काळाचा महिमा आहे आणि जे अंतरंग आहे ते परमेश्वरान दिलेलं अमृत आहे. तेंव्हा अंतरंगातील सौंदर्य जाणून घ्यायचा प्रयत्न कर! म्हणजे तुला कळेल खरे सौंदर्य काय असते ते! अंतरंगातील सौंदर्य जाणून घ्यायला सहवासाची जरुरी लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. माणसा, सौंदर्याच्या माग आपण धावायचं नसतं तर सौंदर्यान आपल्यामाग यावयाच असतं.  

...जाता जाता तुला एवढेच सांगतो, सौंदर्यान बुद्धी विकत घेता येत नाही पण बुद्धीन सौंदर्य नक्कीच घेता येत!               
         

Thursday, October 21, 2010

सुखं आणि दु:ख 

सुखं आणि दु:ख ! माणसाच्या मनात उठलेला प्रचंड कल्होळ, उभ्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्यासाठी चाललेली ही वेडी धडपड.

पण हे सर्व कशामुळे?.....

तर अपेक्षा - निव्वळ अपेक्षा.

आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असणाऱ्या माणसाच्या अपेक्षा, इच्छा-आकांक्षा आणि स्वप्न !

अपेक्षांची पूर्ती म्हणजेच सुखं  आणि अपेक्षाभंग म्हणजे दु:ख !  पण जेथे  इच्छा- आकांक्षाच नाहीत, स्वप्नही नाहीत, तिथं कसलं सुखं आणि कसलं दु:ख !
  
पण ते जगण तरी काय जिथं स्वप्न फुलविण नाही आणि कसली आकांक्षाच नाही.

सुखं आणि दु:ख यांचा आयुष्यातला खेळ म्हणजेच जीवन. दु:ख आहे म्हणून सुखाची जाणीव होते आणि सुख आहे म्हणूनच दु:खही आहे.

मानवी मनाला सुखं आणि दु:ख या दोघांची गरज आहे. माणूस जगतो तो यामुळेच !

Thursday, October 14, 2010

सवयीचा गुलाम


सवयीचा माणूस गुलाम असतो हेच खरमग ती सवय कोणतीही असो बाटलीपासून बाईपर्यंत!


गुलामीत राहावे लागत असून सुद्धा माणूस ही गुलामी का झिडकारू शकत नाहीयाच उत्तर खरच मला अजून पर्यंत तरी कळलेलं नाहीमाणसाचे मन का बरे इतके बेचैन असतेते काकशासाठी आपल्या विचारांच्या मालिकेत बांधून ठेवतखरंच का त्याची व्याप्ती आणि शक्ती इतकी महान आहे कि ज्याच्यावर आपला ताबा राहण कठीण आहे

तू म्हणशील मी मूर्ख आहेविचार करायचाच कशालाएखादया गोष्टीत आपलं नाही पटलं तर दे सोडूनमन ही शांत आणि विचारही बंद!... खरंच का रे ते इतके सोपे आहेइतक्या सहजासहजी त्या सवयीला म्हण किंवा त्या सवयीच्या अस्तित्वाने व्यापून टाकलेल्या मनाला आपण कसे झिडकारू शकतोनाही... नाही रे मित्रा नाहीअरे ते मन आहे रेते सातत्याने प्राणवायूच्या शोधात फिरत असतंजर प्राणवायुच मिळत नसेल तर ते मन कस जगेलमित्रा पाण्यातून काढलेल्या माश्यासारख ते तडफडेल रे!

मन थेंबाचे आकाशलाटांनी सावरलेले असं कुणीतरी म्हटलंयखरच किती अर्थपूर्ण वाक्य आहे हेपरंतु नाही नाही  .... ला नाही सावरता येत माझं हे मनखरच त्याला तुझी नितांत गरज आहे तुझ्या प्रेमाची सावली अन मायेचा आधार हीच माझ्या मनाची  बांधिलकी आहे त्याच माझ्या मनाला सावरणाऱ्या लाटा आहेत.........