Monday, September 27, 2010

सोंग पैशाचं? की प्रेमाचं?





असं म्हणतात की, माणसाला आयुष्यात सर्व प्रकारची सोंग करता येतील, परंतु पैशाचं सोंग त्याला नाही करता येत.

पण ... पण ... मला वाटत पैशाबरोबर माणसाला आणखी सुद्धा एका गोष्टीच सोंग नाही करता येत आणि ते म्हणजे प्रेम!

खरंच पैसा आणि प्रेम या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याचं सोंग ही  करता येत नाही  आणि वेड ही  पांघरता येत  नाही.

म्हणूनच ज्याला पैशाची किमंत आणि प्रेमाची भाषा समजते तो माणूस स्वतःच्या आयुष्यात पैशाची अन प्रेमाची नाटकं करू शकत नाही.

पैशाचं व प्रेमाचं नातंच अस आहे की पैसा माणसाला भूलावितो अन प्रेम त्याला फुलवत!